“मेरे भाई के साथ क्यो लढ रहे हो।” भावासोबत सतत भांडतो म्हणून अवचितवाडीत डोक्यात ओंडका घालून खून

संजय जामुणकर व सुनील मावसकर दोघेही वारी हनुमान जिल्हा अकोला येथील राहणारे आहेत. दोघेही ऊस तोडणी कामगार म्हणून विनायक मोरबाळे यांच्या ट्रॅक्टरवर काम करण्यास आले होते. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

    मुरगूड : अवचितवाडी ता. कागल येथे कटी नावाच्या शेत जमिनीवर ऊस तोडणीस आलेल्या दोन मजुरामध्ये आपल्या भावाशी सतत भांडतो या कारणावरून झालेले भांडण विकोपाला गेले,. त्यातून सुनील चंदूलाल मावसकर (मूळ गाव वारी हनुमान भैरोगड ता. तिल्हारा जिल्हा अकोला) याने आपला मित्र संजय फुलचंद जामुणकर यास डोक्यात ओंडका मारल्याने त्याचा मृत्यू झाला . ही घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वा घडली. या प्रकरणी सुनील चंदूलाल मावसकर मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    मयत संजय जामुणकर

    संजय जामुणकर व सुनील मावसकर दोघेही वारी हनुमान जिल्हा अकोला येथील राहणारे आहेत. दोघेही ऊस तोडणी कामगार म्हणून विनायक मोरबाळे यांच्या ट्रॅक्टरवर काम करण्यास आले होते. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. घटनेच्या दिवशी संजय जामुणकर याचे सुनील मावसकर याचा भाऊ अनिल याच्या बरोबर सतत भांडण होत होते. ” तुम मेरे भाई के साथ क्यो लढ रहे हो।” असा जाब विचारत सुनील मावसकर याने संजय जामुणकर याच्या डोक्यात लाकडी ओंडका घातला.यात तो जखमी होऊन खाली पडला. जखमी अवस्थेत संजय यास मुरगूड ग्रामीण रुग्णालयात ट्रॅक्टर चालक विनायक मोरबाळे यांनी उपचारासाठी दाखल केले पण उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.ओंडक्याच्या घावामुळे संजय याचा मृत्य झाल्याची खात्री पटल्यामुळे घटनेची नोंद करण्यात आली आहे.याबाबतची फिर्याद विनायक शंकर मोरबाळे ( वय ४० , अवचितवाडी)यांनी मुरगूड पोलिसात दिली आहे. सपोनि विकास बडवे अधिक तपास करत आहेत .