कुरुंदवाड अपघातात हेरवाडचा इसम ठार

कुरुंदवाड शहरातील शिकलगार वसाहतीजवळ नरसिंहवाडी च्या दिशेने ट्रॅक्टर ट्रॉली जात होती याच वेळी ट्रॅक्टरच्या मागील चाकात संतोष आवळे हा इसम ठार झाला. या घटनेची माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

    कुरुदवाड: कुरुंदवाड शहरातील शिकलगार वसाहतीजवळ ट्रॅक्टर ट्रेलरच्या मागील चाकाखाली सापडून मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. संतोष सुखदेव आवळे ( वय – ३७ रा. माळभाग हेरवाड) असे मृत झालेल्या इसमाचे नाव इसमाचे नाव आहे.

    याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती माहिती अशी की, कुरुंदवाड शहरातील शिकलगार वसाहतीजवळ नरसिंहवाडी च्या दिशेने ट्रॅक्टर ट्रॉली जात होती याच वेळी ट्रॅक्टरच्या मागील चाकात संतोष आवळे हा इसम ठार झाला. या घटनेची माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात सुरू होते. संतोष आवळे हा इसम पेंटर म्हणून काम करीत होता. अचानक झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने हेरवाड गावात हळहळ व्यक्त होत आहे.