आरक्षणाच्या लढाईसाठी स्टंटबाजी करण्याची गरज नाही; संभाजीराजेंचे सडेतोड उत्तर

मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची तलवार उपसणारे छत्रपती संभाजीराजे यांच्या एका भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या प्रश्नावर मूक आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्या. यामुळे सदर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी संभाजीराजे यांनी एक महिन्यासाठी आपले आंदोलन स्थगित केले. त्यामुळे काहींनी त्यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप केला. त्याचे खंडण करीत, ‘मी छत्रपती आहे, मी मॅनेज कसा होईन’ असा सवाल करत संभाजीराजे यांनी आरक्षणाच्या लढाईसाठी स्टंटबाजी करण्याची गरज नसल्याचे सडेतोड उत्तर टीकाकारांना दिले आहे.

    कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची तलवार उपसणारे छत्रपती संभाजीराजे यांच्या एका भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या प्रश्नावर मूक आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्या. यामुळे सदर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी संभाजीराजे यांनी एक महिन्यासाठी आपले आंदोलन स्थगित केले. त्यामुळे काहींनी त्यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप केला. त्याचे खंडण करीत, ‘मी छत्रपती आहे, मी मॅनेज कसा होईन’ असा सवाल करत संभाजीराजे यांनी आरक्षणाच्या लढाईसाठी स्टंटबाजी करण्याची गरज नसल्याचे सडेतोड उत्तर टीकाकारांना दिले आहे.

    आंदोलन करताना, मोर्चा काढताना जरा आजुबाजूला करोनाची काय स्थिती आहे, याचे भान ठेवा असा सल्लाही त्यांनी मराठा आरक्षणाप्रश्नी ठोक मोर्चा काढण्याचा इशारा दिलेल्या संघटनांना दिला आहे. कोल्हापुरातील भवानी मंडप येथे मराठा समाजातील समन्वयकांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात या पद्धतीने आणखी पाच ते सहा ठिकाणी बैठक घेतल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मराठा आरक्षणासाठी आपला लढा सनदशीर मार्गाने सुरूच राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आपण आंदोलन सुरू केले. सरकार बरोबर झालेल्या चर्चेत बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या. कोल्हापुरात सारथीचे उपकेंद्र सुरू केले. अजून सात केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. मागण्या मान्य होत असताना पुन्हा मोर्चे कशासाठी काढायचे? यापूर्वी 58 मूकमोर्चे काढले आहेत. सरकारला समाजाच्या भावना कळाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा तेच तेच कशासाठी? लोकांना नाहक त्रास कशासाठी द्यायचा असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी उपस्थित केला.