राजू शेट्टी म्हणतात, ‘मी कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही’

राजकारणात कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही. ज्या गोष्टी आम्हाला पटल्या नाहीत. त्याविरुद्ध सर्वांना सोबत घेऊन संघर्ष करत आलो आहे. द्वेष करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी एकत्र आलो नसून तालुक्याचा विकास गतिमान करण्यासाठी एकत्र आलो, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मी कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही. ज्या गोष्टी आम्हाला पटल्या नाहीत. त्याविरुद्ध सर्वांना सोबत घेऊन संघर्ष करत आलो आहे. द्वेष करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी एकत्र आलो नसून तालुक्याचा विकास गतिमान करण्यासाठी एकत्र आलो, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले.
    कवठेसार (ता.शिरोळ) येथे जि. प. सदस्या शुभांगी शिंदे यांच्या निधीतून अंतर्गत रस्ते, डॅा. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, हायमास्ट दिवे व अंर्तगत गटर्स काँक्रीटीकरण करणे अशा ५१ लाख रूपयांच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
    यावेळी माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, महापुराच्या समस्येमुळे कवठेसारमध्ये नुकसान होते. त्यामुळे नवीन कवठेसर वसले आहे. यापूर्वी गावाला मोठ्या प्रमाणात विकासनिधी दिला आहे. इथून पुढेही सर्वांना सोबत घेत सर्वसमावेशक कामे करू.
    गणपतराव पाटील म्हणाले, विकासाच्या दृष्टीमुळे शिंदे यांनी विविध विकासकामे केले आहेत. उर्वरित कालावधीत त्यांच्याकडून अजूनही चांगली विकासकामे होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
    यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष रामचंद्र शिंदे, राजू तेरदाळे, जनगोंडा पाटील, संतोष गाढवे, शेखर पाटील, रफिक मुल्लानी, स्वप्नील गाढवे, महालिंग पाटील, सुभाष पाटील, काशीम मुल्लानी, दादूनशा फकीर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.