
राज्यातील मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली झाली असली तरी कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात (Ambabai Mandir) मात्र अजूनही दर्शनासाठी ई-पासची सक्ती (E-Pass) आहे. ही ई-पासची सक्ती रद्द करावी या मागणीसाठी भाजपच्या वतीने अंबाबाई मंदिराबाहेर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर : राज्यातील मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली झाली असली तरी कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात (Ambabai Mandir) मात्र अजूनही दर्शनासाठी ई-पासची सक्ती (E-Pass) आहे. ही ई-पासची सक्ती रद्द करावी या मागणीसाठी भाजपच्या वतीने अंबाबाई मंदिराबाहेर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात अद्यापही दर्शनासाठी ई-पासची सक्ती आहे. हा ई-पास नसल्यास भाविकांना दर्शन घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे भाजपने याविरोधात आंदोलन केले आहे. महाद्वार गेट समोर हे आंदोलन करत भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. एका बाजूला बाजारपेठेत गर्दी असताना भाविकांना देवीच्या दर्शनासाठी वंचित का ठेवले जाते? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, दिवाळीसाठी महाद्वार रोडवर गर्दी असताना याच कालावधीत झालेल्या आंदोलनाने अनेकांचं लक्ष वेधले आहे. येत्या चार दिवसांत ई-पासची ही सक्ती रद्द न केल्यास आम्ही मंदिराची कुलूप तोडून भाविकांना प्रवेश देऊ, असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिला.