In Kolhapur, Jansurajya Shakti gave Rs 35 lakh to each corporator to become the mayor of the party; Sensational assassination of MLA Vinay Kore

कोल्हापूर महानगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला 35 लाख रुपये दिल्याचा मोठा गौप्यस्फोट आमदार विनय कोरेंनी केला आहे(In Kolhapur, Jansurajya Shakti gave Rs 35 lakh to each corporator to become the mayor of the party; Sensational assassination of MLA Vinay Kore). भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक असल्याची कबुलीही त्यांनी दिली.

    कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला 35 लाख रुपये दिल्याचा मोठा गौप्यस्फोट आमदार विनय कोरेंनी केला आहे(In Kolhapur, Jansurajya Shakti gave Rs 35 lakh to each corporator to become the mayor of the party; Sensational assassination of MLA Vinay Kore). भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक असल्याची कबुलीही त्यांनी दिली.

    विधानपरिषद निवडणुकीपासून कोल्हापूर जिल्ह्यात विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    चूक केली कबूल

    कोल्हापूर महानगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर असावा, यासाठी प्रत्येक नगरसेवकाला 35-35 लाख दिले. हे करताना चांगले वाटले. मात्र, नंतर भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती याची जाणीव झाली. सर्वसामान्य लोकांच्या मनात राजकारणा बद्दल तिरस्कार निर्माण होईल, असे राजकारण यापुढे बंद झाले पाहिजे असे कोरे म्हणाले.

    बिनविरोध निवडणुकीसाठी पुढाकार

    विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराला यश आले. लोकशाहीत निवडणुका झाल्या पाहिजेत. मात्र, त्यांचे पावित्र्यही जपले गेले पाहिजे. ‘मतदारसंख्या असणाऱ्या निवडणुकीत आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे लोकशाहीचे पावित्र्य जपण्यासाठी बिनविरोध निवडणूक करणे गैर नाही. मर्यादित मतदारसंख्या असणाऱ्या काही वेगळ्या गोष्टी पुढे येतात, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वच पक्षांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.