मुरगूडात किरीट सोमय्याचे स्वागत काळ्या झेंड्यानी :  नगराध्यक्ष राजेखान जमादार

मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही किरीट सोमय्या यांना शहरात प्रवेश देऊ नये त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते असे निवेदन मुरगुड पोलीस स्टेशनला गेले होते.त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.नगर परिषदेने प्रवेश बंदीचा केलेला ठरावाची चर्चा राज्यभर झाली होती. या घटनांनंतर सोमय्या यांच्या मंगळवार दिनांक २८ रोजी दुसऱ्यांदा होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या दिवशी मोठा संघर्ष होणार अशी स्थिती निर्माण झाली होती.

    मुरगूड : मुरगूड नगरपरिषदने किरीट सोमय्या यांना शहरात प्रवेश बंदीचा निर्णय घेतला होता. त्या आशयाचा ठराव नगरपरिषदेने पास केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मुरगूड नगरपरिषदेने किरीट सोमय्या यांना प्रवेशास बंदी न करता ते ज्या मार्गावरून येणार आहेत तेथे कोणीही उपस्थित न राहता त्या मार्गावर काळे झेंडे लावून त्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुरगूड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजस्थान जमादार याने पत्रकार परिषदेत दिली.

    मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही किरीट सोमय्या यांना शहरात प्रवेश देऊ नये त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते असे निवेदन मुरगुड पोलीस स्टेशनला गेले होते.त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.नगर परिषदेने प्रवेश बंदीचा केलेला ठरावाची चर्चा राज्यभर झाली होती. या घटनांनंतर सोमय्या यांच्या मंगळवार दिनांक २८ रोजी दुसऱ्यांदा होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या दिवशी मोठा संघर्ष होणार अशी स्थिती निर्माण झाली होती.

    मंत्री मुश्रीफ यांनी आवाहन केल्या नुसार आता त्यांना होणारा विरोध मावळला आहे .मुश्रीफ यांनी आवाहन केल्यानंतर लगेच पालिका कार्यालयात पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष जमादार यांनी आपली व पाहिजे.जर दौऱ्यामध्ये ठरल्या प्रमाणे ते मुरगूडला आलेच तर त्यांना कोणीही नागरिक विरोध करण्या साठी जाणार नाहीत.सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहतील.शिवाय अत्यंत शांततेत सोमय्या ज्या मार्गावरून पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहेत त्या मार्गावर मात्र त्यानी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून काळे झेंडे लावले जातील.यावेळी उनगराध्यक्षा रंजना मंडलिक, नगरसेवक विशाल सूर्यवंशी,नगरसेवक रवी परीट, पक्षप्रतोद संदीप कलकूटकी,सचिन मेंडके,माजी नगराध्यक्ष प्रकाश चौगले आदी प्रमुख उपस्थित होते.