chakka jam protest

कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती ताराराणी चौकात चक्का जाम आंदोलन(Protest In Kolhapur) करण्यात आले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनात कोल्हापुरातील (Kolhapur) सकल मराठा समाज(Maratha Community Protest) मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

    कोल्हापूर: मराठा समाजाला आरक्षण द्या या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती ताराराणी चौकात चक्का जाम आंदोलन(Protest In Kolhapur) करण्यात आले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनात कोल्हापुरातील (Kolhapur) सकल मराठा समाज(Maratha Community Protest) मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

    खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मूक आंदोलनानंतर राज्य सरकारने बैठक घेऊन मागण्या मान्य करण्याच्या केवळ वल्गना केल्या आहेत,त्याचे नोटिफिकेशन काढले नाही,अथवा राज्यपालांनी सुद्धा अद्याप त्याचे कोणतेही मंजुरीचे आदेश काढलेले नाहीत.त्याच प्रमाणे सारथी संस्थेला सुद्धा १००० कोटी देण्याची भाषा म्हणजे निव्वळ दिशाभूल असल्याचा आरोप करत अद्याप आरक्षणासह मराठा समाजाच्या ३७ मागण्यांसाठी आज कोल्हापुरात छत्रपती ताराराणी चौकात सकाळी ११ वाजल्यापासून चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

    या आंदोलनात बाबा पार्टे,निवास साळोखे,जयंत पाटील,सुजित चव्हाण,अजित राऊत,दिलीप देसाई,समरजित घाटगे,जयेश कदम,बाबा इंदुलकर,सचिन तोडकर,कुलदीप गायकवाड,संग्राम निकम,दिलीप पाटील,स्वप्नील पार्टे आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.