मराठा समाजाने काळानुसार रुढी-परंपरांमध्ये बदल स्वीकारायला हवेत : निवेदिता माने

हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने आयोजित अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे लिखित 'पुढचं पाऊल' या पुस्तकावरील चर्चासत्रात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थानी इचलकरंजी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष पै.अमृत भोसले होते.

    हातकणंगले : मराठा समाजाने प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरतानाच काळानुसार रुढी-परंपरांमध्येही बदल स्वीकारायला हवेत, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने यांनी केले.समाजातील सुधारणांविषयी ज्येष्ठ विचारवंत राजेंद्र कोंढरे यांनी लिहिलेले ‘पुढचं पाऊल’ पुस्तक निश्चितच दिशादर्शक असून ते घरोघरी पोहचायला हवे, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

    हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने आयोजित अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे लिखित ‘पुढचं पाऊल’ या पुस्तकावरील चर्चासत्रात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थानी इचलकरंजी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष पै.अमृत भोसले होते.

    डॉ.माने म्हणाल्या, “चर्चासत्रामुळे समाजामध्ये विचारमंथन होते. समन्वय समितीच्यावतीने आयोजित केलेला चर्चासत्राचा उपक्रम आदर्शवत आहे.पै अमृत भोसले म्हणाले, समाजातील कार्यकर्त्यांनी संघटित होणे गरजेचे असून त्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकांमध्ये विचारांची देवाणघेवाणही व्हायला हवी.दरम्यान ‘पुढचं पाऊल’ पुस्तकाचे लेखक राजेंद्र कोंढरे यांनी ऑनलाइनद्वारे या चर्चासत्रात सहभाग घेतला.समाजाच्या प्रबोधनासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देवून काम करावे,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.दयासागर मोरे यांनी स्वागत केले. हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये चर्चासत्र आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट केला.

    समन्वय समितीचे सचिव भाऊसाहेब फास्के (रुई), ॲड.संग्रामसिंह निंबाळकर(नेज), बी.एम.पाटील (रेंदाळ), हातकणंगलेतील नगरसेवक दीनानाथ मोरे, डॉ.सचिन पोवार, सुभाष चव्हाण, बाबुराव जाधव, पंडित निंबाळकर, स्वप्निल करडे (हातकणंगले), गजानन खोत, दिलीप खोत (तारदाळ), रुईतील मराठा समाजाचे अध्यक्ष सुभाष पाटणकर, शिवाजी वाघरे (आळते), मराठा महासंघाचे युवा जिल्हा संघटक मिलिंद ढवळे-पाटील (रूकडी), रमेश पाटील, प्रा.रवींद्र पडवळे,(कोरोची), रमेश घोरपडे (माणगाव) सुरेश भगत (कुंभोज), महादेव चौगुले (चंदुर) प्रल्हाद तालुगडे (मंगरायाचीवाडी) आदींनी ‘पुढचं पाऊल’या पुस्तकावर मते मांडून चर्चा केली. दीपक कुन्नुरे यांनी आभार मानले.