मागण्या पूर्ण करा अन्यथा बेमुदत काम बंद करू ; कोल्हापुरातील खाणी क्रशर व पुरवठा व्यावसायिकांचा इशारा

सध्या सर्व खाणींची ऊत्खनन झालेल्या खाणींची शासनाकडून ets मोजणी करून रॉयल्टी वसूली केली जात असताना प्रतिपास ३२ रुपयेचा भुर्दंड यास विरोध आहे . तर दगड उत्खनन करण्यासाठी तात्पुरते परवाने १५ते २० दिवसासाठी दिले जात आहेत ते पूर्ववत १ वर्षासाठी करावेत , अशी मागणी करण्यात आली. तसेच इंधन, वीज,मजूर यांच्या दरात झालेली दुप्पट वाढ , वाहन व क्रशर मशनरीच्या स्पेअर पार्टमध्ये झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर दरवाढ करणे अपरिहार्य आहे .

    कोल्हापूर : कोरोना महामारी, सातत्याने येणारा महापूर व उदयोग जगतातील आर्थिकमंदी यामुळे बांधकाम व्यवसाय पर्यायाने खाण व क्रशर व्यवसाय संकटात असताना राज्य सरकारने रॉयल्टी दरात केलेली वाढ तसेच ई पासच्या नावाखाली खाजगी सॉफ्टवेअर कंपनीकडून पास घेण्याची सक्ती यास खाण- क्रशर असोसिएशनचा विरोध आहे .याबाबत त्यांनी आज पत्रकार पारेषद घेतली.

    सध्या सर्व खाणींची ऊत्खनन झालेल्या खाणींची शासनाकडून ets मोजणी करून रॉयल्टी वसूली केली जात असताना प्रतिपास ३२ रुपयेचा भुर्दंड यास विरोध आहे . तर दगड उत्खनन करण्यासाठी तात्पुरते परवाने १५ते २० दिवसासाठी दिले जात आहेत ते पूर्ववत १ वर्षासाठी करावेत , अशी मागणी करण्यात आली. तसेच इंधन, वीज,मजूर यांच्या दरात झालेली दुप्पट वाढ , वाहन व क्रशर मशनरीच्या स्पेअर पार्टमध्ये झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर दरवाढ करणे अपरिहार्य आहे . सर्व प्रकारच्या खडीसाठी -२८oo कोल्हापूर जिल्हयातील सर्व खाणी क्रशर व पुरवठा बेमुदत बंद ठेवण्यात येणाररुपये व क्रश सँन्ड साठी ४२०० प्रति ब्रास जागेवरचे दर करण्यात आले आहेत. तसेच शासनाकडून अन्यायी रॉयल्टी दरवाढीविरोधात व ई पास सक्ती विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे व शासन दरबारी मागणी केली असून, आम्हास समाधानकारक न्याय मिळाला नाही तर कोल्हापूर जिल्हयातील सर्व खाणी क्रशर व पुरवठा बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे . या पत्रकार परिषदेस कोल्हापूर जिल्ह स्टोन क्रेशर व खाण ओनर्सचे अध्यक्ष प्रकाश पाटील, डॉ प्रदिप पाटील, सचिव रमेश पोवार, मोहन पाटील, विठ्ठल पाटील, सुजित पोवार , शांतीकुमार पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते .