चंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर

आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत(Press Conference In Kolhapur) मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) म्हणाले चंद्रकांत पाटील दुःखात आहेत, अस्वस्थ आहेत.आम्ही छातीवर काय डोक्यावर हात ठेवून सांगतो की आम्ही सुखात आहोत.सत्तेत आहोत,अनुभव नसताना आम्ही कोरोनासारख्या महामारीला समर्थपणे तोंड देतोय असेही ते म्हणाले.

    कोल्हापूर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) आमदार प्रतापराव सरनाईक यांच्या लेटर बॉम्बवर(Letter Bomb) प्रतिक्रिया देताना पुण्यात म्हणाले की, महाविकास आघाडीने(Mahavikas Aghadi) छातीवर हात ठेवून सांगावे की आम्ही सुखात आहोत.यावर आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत(Press Conference In Kolhapur) मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले चंद्रकांत पाटील दुःखात आहेत, अस्वस्थ आहेत.आम्ही छातीवर काय डोक्यावर हात ठेवून सांगतो की आम्ही सुखात आहोत.सत्तेत आहोत,अनुभव नसताना आम्ही कोरोनासारख्या महामारीला समर्थपणे तोंड देतोय असेही ते म्हणाले.

    शिवसेनेच्या आमदारांची कामं होत नाहीत असा प्रतापराव सरनाईक यांच्या पत्रात उल्लेख असल्याचे सांगितल्यावर मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री त्यांचे आहेत,त्यांची कामे होण्याबद्दल आमची काही अडचण नाही. आमच्यापेक्षा दुप्पट कामं त्यांनी करावीत.

    खासदार संभाजीराजे पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लॉन्ग मार्च काढणार आहेत यावर मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,संभाजीराजे यांनी मूक आंदोलन केल्यानंतर मी आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांना तात्काळ मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यासाठी आमंत्रित केले.त्या बैठकीत त्यांच्या सहा मागण्या मान्य केल्या.त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सारथी बाबत पुण्यात बैठक घेऊन त्यांचे समाधान होईल असे निर्णय घेतले.

    आता राहिला प्रश्न आरक्षणाचा तो राज्यसरकार च्या हातात नाही,त्यासाठी आपणाला केंद्र सरकार कडे जावे लागेल असे मी त्याचवेळी सांगितले होते, फेरविचार याचिकेचा निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि आम्ही सगळे मिळून सर्वांना मी आवाहन केले होते, मराठा समाजाची सहनशीलता बघण्याची आवश्यकता नाही,त्यांना आपण न्याय दिला पाहिजे,,गरीब मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण देण्यासाठी आपण हातात हात घालून एकत्र आले पाहिजे ही भूमिका मी मांडली होती असेही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

    मराठ्यांच्या आंदोलनानंतर आता ओबीसी रस्त्यावर उतरत आहेत असे निदर्शनास आणून दिल्यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले की, मूक आंदोलनाच्या दिवशी संध्याकाळी आमची ओबीसी बरोबर बैठक झाली त्यावेळी पुन्हा आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊन फेरयाचिका करायची आणि २०११ च्या जनगणनेचा डाटा सर्वोच्च न्यायालयाकडून मागवून घेऊन लवकरात लवकर ओबीसी ना आरक्षण देण्याचा प्रयत्न करायचा असे त्या बैठकीत ठरलेलं आहे.पन्नास टक्क्यांच्या आत जवळपास २० जिल्ह्यात ओबीसी आरक्षणचा प्रश्न येत नाही.१६ जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त ओबीसी आरक्षणाचा प्रश्न येतो त्याठिकाणी हा विचार करण्याची आवश्यकता आहे असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केले.त्याचबरोबर ७० टक्के लसीकरण झाल्याशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही असेही मुश्रीफ म्हणाले.