आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

    कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने आशा व गटप्रवर्तक यांचा न्याय हक्क मागण्यासाठी कोल्हापूरमधील आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. सकाळी अकरा वाजता रेल्वे स्थानकावर जमून तेथून हा मोर्चा कलेक्टर ऑफिसकडे आला. यावेळी सामाजिक संस्था, संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, सक्रिय सहभागी झाले होते.

    कोविड-१९ सारख्या जागतिक महामारीमध्ये आशा व गटप्रवर्तकांनी स्वतःचा जीव जोखीममध्ये घालून अविरत काम केले आहे. मात्र, शासनाकडून प्रचंड दुर्लक्ष केले. मागील दीड वर्षापासून कोविड-१९ च्या कामासाठी प्रति दिवस ३३ रुपये तर गटप्रवर्तकांना प्रति दिवस १५ रुपये दिले आहेत. शेतात जाणारी शेतमजूर महिला दोनशे तीनशे रुपये रोजगार घेते. धुणीभांडी करणारी घरेलू कामगार महिला, एका घरच्या कामासाठी महिन्याला तीन हजार रुपये घेते आणि आरोग्य खात्यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात काम करून शासन आशा व गटप्रवर्तक यांचे प्रचंड मानसिक शोषण व आर्थिक शोषण करत आहे. आतापर्यंत जिल्हातील सर्व आमदार, खासदार व आरोग्यमंत्री यांना प्रलंबित मागणांबाबत निवेदने दिली.

    आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना मागन्याचे निवेदन पाठवली. मात्र, त्याची दखल सरकारने घेतली नाही. आरोग्य कोविडच्या काळात खेडी पाडी, गावा गावात, वस्तीवर, वाड्यावर पायी फिरुन विना मोबदला कामे करून घेतली. सरकार व संघटना यांच्यामधील चर्चा निष्फळ ठरली. त्यांचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरची लढाई करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

    आजच्या मोर्चात नेत्रदीपा पाटील जिल्हाध्यक्ष, उज्वला पाटील सचिव, संगीता पाटील खजिनदार
    सर्व जिल्हा कमिटी कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन आदी सहभागी झाले होते.