महाराष्ट्रातील विवेकी आवाज हरपला; संघर्ष यात्रेचा सूर्य मावळला, चळवळ पोरकी

प्रा.एन. डी. पाटील (N. D. Patil) यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मंगळवारी कोल्हापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    कोल्हापूर : पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते, थोर विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे सोमवारी एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. मागील चार दिवसांत त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. प्रा.एन. डी. पाटील (N. D. Patil) यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मंगळवारी कोल्हापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    प्राध्यापक एन. डी .पाटील यांची ११ जानेवारी रोजी प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारासाठी डॉक्‍टरांचे विशेष पथक लक्ष ठेवून होते. यावेळी त्यांचा सिटीस्कॅन करण्यात आला होता. यामध्ये त्यांच्या मेंदूच्या काही भागाला इन्फांनट झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. यापूर्वी त्यांच्यावर एका किडनीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना रेनॉल फेल्यूअर आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती; तसेच त्यांना हायफॉक्यासीयाही झाले होते. त्यामुळे वैद्यकीय पथकाचा उपचार सुरू असताना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. \

    उपचार सुरू असतानाच सोमवारी दुपारी बारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी तसेच हॉस्पिटलस्थळी धाव घेतली. मंगळवारी कोल्हापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच आणि निकटवर्तीय अंत्यविधी उपस्थित राहणार आहेत.

    डॉ. एन. डी. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शाहू कॉलेज , कदमवाडी रोड कोल्हापूर येथे उद्या सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत ठेवण्यात येणार आहे.

    गेली सत्तर वर्ष महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, कामगार महिला अशा अनेक घटकांसाठी संघर्षाची मशाल पेटवलेले आणि अविरत यातील प्रश्नांशी लढा देणारे एन.डी.पाटील यांचे निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात एन.डी.पाटील यांचे योगदन अमुल्य आहे. आसा हा महाराष्ट्राचा विवेकी अवाज हरपल्याने आज अखंड महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. सर्वच क्षेत्रातून शोक भावना व्यक्त होत आहेत.