गोकुळ दूध विक्रीचा नवीन उच्‍चांक; एका दिवसात १५ लाख २५ हजार लिटर्स दूध विक्री

    कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकुळ) उत्‍पादक व ग्राहकांचा विश्‍वास संपादन करून त्‍यांना जास्‍तीत जास्‍त लाभ करून देण्‍यासाठी नेहमीच प्रयत्‍न केलेला आहे. त्‍यामुळेच गोकुळच्‍या दररोजच्‍या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्‍याने वाढ होत आहे. यावर्षी गोकुळने एक दिवसाच्‍या दूध विक्रीचा नवीन उच्‍चांक प्रस्‍थापित करताना १५ लाख २५ हजार लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात केलेली आहे.

    गेल्यावर्षी याच दिवशी म्‍हणजे ईदच्‍या दिवशी १२ लाख ६२ हजार लिटर्स इतकी दूध विक्री गोकुळने एक दिवसात केली होती. गतवर्षीच्‍या तुलनेत गोकुळच्‍या विक्रीत जवळजवळ २ लाख ६३ हजार लिटर्सने वाढ झालेली आहे, अशी माहिती संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी दिलेली आहे. या कौतुकास्‍पद कामगिरीबद्दल जिल्‍ह्याचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जिल्‍ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गोकुळ व्‍यवस्‍थानाचे अभिनंदन केले.

    चेअरमन विश्‍वास पाटील यांनी विक्रीमध्‍ये नवीन मानदंड प्रस्‍थापित करताना गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. गोकुळने दिवसाला २० लाख लिटर्स दूध संकलन व तितकीच विक्री करण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवलेले असून, हे उद्दिष्‍ट गोकुळ दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्वासहार्ततेवर साध्‍य करू असा विश्‍वास यावेळी व्‍यक्‍त केला. या यशामध्‍ये गोकुळचे दूध उत्‍पादक, दुधसंस्था ग्राहक वितरक व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे असल्‍यामुळे ते कौतुकास पात्र आहेत. म्‍हणून मी त्‍यांना संचालक मंडळाच्‍या वतीने धन्‍यवाद देतो, असे स्‍पष्‍ट केले. चेअरमन विश्‍वास पाटील यांनी गोकुळ परिवाराच्या वतीने मुस्‍लिम बांधवाना ईदच्‍या शुभेच्‍छा दिल्या.