कोरोनानंतर आता ‘या’ रोगाचे कोल्हापुरातील किणीमध्ये थैमान; रुग्णसंख्या वाढल्याने घबराट

किणी (ता. हातकणंगले) येथे डेंग्यूचे (Dengue) थैमान घातले आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने (Dengue Patients Increases) अनेक रुग्णांवर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने डेंग्यू रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली असली तरी सर्वेक्षण व प्रबोधन करत आहेत.

    पेठ वडगाव : किणी (ता. हातकणंगले) येथे डेंग्यूचे (Dengue) थैमान घातले आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने (Dengue Patients Increases) अनेक रुग्णांवर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने डेंग्यू रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली असली तरी सर्वेक्षण व प्रबोधन करत आहेत. उपचारासाठी खाजगी रुग्णालयातच जावे लागत आहेत. उपचाराचा खर्च पाहता जनतेत मात्र घबराट पसरली आहे.

    जोरकस ताप, डोळे आणि डोकेदुखी, तोंडाला कोरड पडणे, अंगदुखी, त्वचा लाल होणे, अशक्तपणा, उलट्या होणे, उचक्या लागणे, तळहात आणि तळपायांना खाज येणे, भूक कमी लागणे किंवा मळमळणे इत्यादी डेंग्यूची सर्वसाधारण लक्षणं दिसून येतात. ताप कमी झाल्यानंतर प्लेटलेट कमी होण्यास सुरुवात होते. साधारणतः चार ते पाच दिवसात पेशी वाढायला सुरुवात होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    रुग्णालयात ३०० रुग्ण दाखल

    महिनाभरात किणीत सुमारे २५० ते ३०० रुग्ण विविध खासगी रुग्णालयात डेंग्यूवर उपचार घेत आहेत. अशीच परिस्थिती वाठार गावात आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह आशा वर्कर्स घरोघरी जाऊन डेंग्यूविषयी जनजागरण करीत आहेत. मात्र, उपचार खाजगी रुग्णालयातच घ्यावे लागत आहेत. तर ग्रामपंचायतीकडून ही जुजबी ऊपाययोजना राबवल्याने या आजाराचे रुग्ण मोठया संख्येने वाढत असल्याचे चित्र आहे.