rajendra patil yadrawkar

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर  यांना विरुद्ध सर्वपक्षीय नेत्यांनी मोट बांधून पराभूत करण्याचा सर्वपक्षीय राजकीय विरोधकांचा डाव अंगलट आला आहे.

    कुरुंदवाड : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर  यांना विरुद्ध सर्वपक्षीय नेत्यांनी मोट बांधून पराभूत करण्याचा सर्वपक्षीय राजकीय विरोधकांचा डाव अंगलट आला आहे. यड्रावकरांच्या दणदणीत विजयामुळे राजू शेट्टी यांच्यासह सर्वच विरोधकाना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
    उद्यान पाटील गणपतराव पाटील यांच्या गटाने आगामी काळात  राजकीय मदत न घेता वाटचाल करणे गरजेचे आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कोंडीत पकडण्याचे व त्यांचे राजकीय वजन खच्चीकरण करण्याचा बेत विरोधकांनी  आखला होता मात्र या विरोधकांचे खरे चेहरे उघडे पाडण्यात संस्था गटातील मतदार यशस्वी झाले आहेत. यामागे एकच कारण की राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे बंधू माजी उपनगराध्यक्ष युवा नेते संजय पाटील मालक यड्रावकर यांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहे एकदा मनावर घेतलेले काम त्यांनी यशस्वी करून दाखवले आहे परफेक्ट नियोजन करून सभासदांच्या आणि शिरोळ तालुक्याच्या जनतेच्या विश्वासावर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आणि विरोधकांनाधोबीपछाड करत  एकतर्फी विजय मिळवून या निवडणुकीत सक्सेसफुल झाले आहेत.
    विधानसभेच्या निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना विक्रमी मतांनी विजयी केले त्यावेळी अनेक रथी-महारथी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे नाम. पाटील विकास कामावर विजयी झाले आहेत याचे दुःख विरोधकांना झाले आहे  याचे उट्टे काढण्यासाठी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गणपतराव पाटील यांना तयार केले दोन साखर सम्राटांची झुंज लावली. मतदारांच्या आकड्यांची बेरीज सुरू ठेवली दादा आता नाही तर कधीच नाही असे सांगण्यात विरोधक कमी पडले नाहीत. दादानी देखील त्यांच्या हो ला हो म्हणत निवडणूक प्रक्रियेला सामोरे गेले पद्धतशीरपणे आपला राजकीय डाव साधण्यात विरोधक यशस्वी झाले कारण गणपतराव पाटील यांची उमेदवारी म्हणजे गणपतराव पाटील त्यांच्या गटात आणि यड्रावकर यांच्या गटात उभी फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तो कितपत यशस्वी होणार हे काळच ठरवणार आहे हा विरोधकांचा राजकीय डाव  संजय यड्रावकरांचा  लक्षात आला सावध पवित्रा घेत शांत, संयमी, राजकारणाचा पट उलगडला आणि विरोधकांनी ही निवडणूक चुरशीची होणार असा टाहो फोडला होता. मात्र, किंगमेकर संजय पाटील यांनी हा दावा फोल ठरवला.
    निश्चित केले आहे.