शिवसैनिकांनी आंतरराज्य सीमेवरील उतरविला कन्नड वेदिकेचा झेंडा

    कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील पाच मैल-बोरगाव येथील महाराष्ट्र हद्दीतील स्वागत कमानीवर कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त कन्नड वेदीकेचा झेंडा लावण्यात आला होता. ही घटना शिरोळ तालुक्यातील शिवसैनिकांना कळताच तातडीने त्या ठिकाणी जावून कन्नड वेदिकेचा झेंडा उतरवून महाराष्ट्राचा भगवा झेंडा लावून घोषणाबाजी केली.

    कर्नाटक राज्योत्सव दिनाचे औचित्य साधून काही कन्नडिगांनी महाराष्ट्र हद्दीत असलेल्या कमानीवर कन्नड वेदिकेचा झेंडा लावला होता. याची माहिती शिरोळ तालुक्यातील शिवसैनिकांना मिळताच शिवसैनिकांनी त्या ठिकाणी पोहचून घोषणाबाजी करत कन्नड वेदिकेचा झेंडा उतरला व महाराष्ट्राचा भगवा ध्वज लावून घोषणाबाजी केली. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते.

    यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक धनवडे, युवासेना तालुका समन्वयक निलेश तवंदकर, युवासेना उपतालुकाप्रमुख मंगेश पाटिल, शिवसेना उप तालुकाप्रमुख युवराज घोरपडे, ऋषभ चौगुले, जयसिंग वडर, श्रेणीक माने, अमिर तहसीलदार, पृथ्वीराज रजपूत, निग्गाप्पा कृट्टेकरी, कृष्णा कोळी ,भरत सलगरे , निशांत गोरे,अमित कदम, श्रेयश धुमाळे , महेश वडर, कपिल माळी,अक्षय पाटिल व शिवसैनिक उपस्थित होते.