
आयुष्याच्या सुरुवातीलाच हृदयरोगासह दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्यच लोपलेले असते. आजारामुळे बालजीवाला लागलेल्या घरघरीमुळे संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य हरवते.
कागल : आयुष्याच्या सुरुवातीलाच हृदयरोगासह दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्यच लोपलेले असते. आजारामुळे बालजीवाला लागलेल्या घरघरीमुळे संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य हरवते. यशस्वी शस्त्रक्रिया होऊन रोगमुक्त झालेल्या या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्याचा मनाला मोठा आनंद आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
रोगमुक्त चिमुकल्यांचा सत्कार
कोरोना संसर्गाच्या महामारीत लॉकडाऊन व कर्फ्युमुळे राज्यातील मोफत वैद्यकीय उपचारांची सेवा बंद झाली होती. अलीकडेच ती सुरू झाल्यानंतर लहान मुलांवरील गंभीर आजारांच्या दीडशेहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्यासाठी रोगमुक्त चिमुकल्यांचा सत्कार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माणिक रमेश माळी होत्या. यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, चंद्रकांत गवळी, सबिना साजिद मुश्रीफ, माऊली महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा अमरिन नविद मुश्रीफ, माऊली महिला विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा नबिला अबिद मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, पी. बी. घाटगे, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, संग्राम गुरव, पद्मजा भालबर, संजय चितारी, माधवी मोरबाळे, वर्षा बन्ने, अलका मर्दाने आशाकाकी जगदाळे, जयश्री सोनुले, संजय ठाणेकर, नेताजी मोरे, बच्चन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन विवेक गवळी व विशाल बेलवळेकर यांनी केले.