दुर्दैवी ! उपोषणस्थळीच एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाऱ्याच्या झटक्याने मृत्यू

गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Workers Strike) संप सुरु आहे. त्यांच्या प्रश्नावर अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यातच आज याबाबत मुंबईत बैठक झाली. परंतु, यावेळीही तोडगा न निघाल्याने उपोषणस्थळीच एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाऱ्याच्या तीव्र झटक्याने मृत्यू (ST Worker Died Due to Heart Attack) झाला.

    इचलकरंजी : गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Workers Strike) संप सुरु आहे. त्यांच्या प्रश्नावर अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यातच आज याबाबत मुंबईत बैठक झाली. परंतु, यावेळीही तोडगा न निघाल्याने उपोषणस्थळीच एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाऱ्याच्या तीव्र झटक्याने मृत्यू (ST Worker Died Due to Heart Attack) झाला.

    शरणाप्पा गिरमलप्पा मुंजाळे (वय ३१, रा. मूळ अक्कलकोट) असे त्याचे नाव आहे. शरणाप्पा यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने आयजीएम रुग्णालयात (IGM Hospital) उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. शरणाप्पा यांच्या मृत्यूने राज्यातील एसटी कामगारांच्या बळींचा आकडा ७२ झाला आहे.

    दरम्यान, या प्रकारानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या प्रकरणाला दोषी असलेल्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला.