कनिष्ठ महाविद्यालयीन जिल्हा संघटनेच्यावतीने शिक्षण उपसंचालकांना निवेदन

सन २०२०-२०२१ ची संच मान्यता झालेली नसून यावर्षी तर कला शाखेला विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने तुकड्यां ची संख्या कमी . तेव्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हायस्कूल संलग्न तुकडीतील विद्यार्थी संख्या ४० असावी व सिनिअर कॉलेज संलग्न विद्यार्थी संख्या ६० असावी, अशी मागणी करण्यात आली.

    कागल : कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी निवेदन देण्यात आले. सर्व मागण्याच्या बाबतीत सोनवणे यांच्याबरोबर मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक चर्चा झाली असून कोणत्याही शिक्षकावर अन्याय होऊ देणार नाही. असे आश्वासन शिक्षण उपसंचालक सोनवणे यांनी दिले. निवेदनात म्हटले आहे की वाढीव पदांना नियुक्ती दिनांकापासून नियुक्ती देऊन त्या शिक्षकांचे वेतन सुरू करावे .आयटी विषय हा अनुदानित करून त्या विषय शिक्षकांना अनुदानित शिक्षकांप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात यावी .कनिष्ठ महाविद्यालयाची संचमान्यता सन२०१८-२९१९ प्रमाणे कायम ठेवावी.सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला मिळावे व ते राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात यावे.अर्धवेळ शिक्षकांची पूर्णवेळ पदावरील नियुक्ती त्वरित मान्य करावी .सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना देखील दहा, वीस, तीस वर्षाच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना लागू करावी.वरिष्ठ व निवड श्रेणी चे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावे. कला शाखेकडील विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याने विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यात यावी.घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधन वाढवण्यात यावे .शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी विनाअट द्यावी. निवृत्त शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम व सेवा निवृत्ती वेतन विषयक लाभ त्वरित मिळावे.शिक्षक व शिक्षकेतर पदभरती तातडीने सुरू करण्यात यावी. वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुट्ट्या बाबत योग्य नियोजन करण्यात यावे. व्यपगत पदे पुनरुज्जीवित करण्यात यावी.

    निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष प्रा.टी.एस.दुर्गी, सचिव प्रा.संजय मोरे, उपाध्यक्ष प्रा.आर.बी.गावडे, कार्याध्यक्ष प्रा.तुकाराम सरगर व प्रा.डी.बी.गायकर, सहसचिव प्रा.बसाप्पा मडीवाळ, कोषाध्यक्ष प्रा.शिवाजीराव होडगे, उपाध्यक्ष प्रा.एन.बी.बुराण, उपाध्यक्ष प्रा.अमरसिंह शेळके, उपाध्यक्ष प्रा.संदिप सावगावे सहसचिव एम.के.परीट,प्रा.नारायण राणे,वारणा महाविद्यालयाच प्रा आनंदराव देशमुख सदस्य प्रा.अमर चव्हाण,प्रा.विकास माने,प्रा.उदय आतकिरे,प्रा.नितीन पोतदार,प्रा.चंद्रशेखर कांबळे,प्रा.नामदेव चोपडे,प्रा.डॉ.अमित रेडेकर, अरविंद सावंत, अरविंद पाटील, अनिलकुमार पाटील, कुंडलिक जाधव, शशिकांत खोराटे,महिला प्रतिनिधी प्रा.अनिता चौगुले-पाटील,प्रा.संध्या खरात-नागण्णावर,प्रा विद्या शेवाळे-मोरे यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयाचे अनेक शिक्षक उपस्थित होते.

    सन २०२०-२०२१ ची संच मान्यता झालेली नसून यावर्षी तर कला शाखेला विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने तुकड्यां ची संख्या कमी . तेव्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हायस्कूल संलग्न तुकडीतील विद्यार्थी संख्या ४० असावी व सिनिअर कॉलेज संलग्न विद्यार्थी संख्या ६० असावी, अशी मागणी करण्यात आली.