
कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक आवारात आंदोलन तीव्र झाले असून, सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याने निराश झालेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न (ST Worker Attempt Suicide) केला.
कोल्हापूर : एसटी महामंडळाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन (ST Workers Strike) सुरू केले आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक आवारात आंदोलन तीव्र झाले असून, सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याने निराश झालेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न (ST Worker Attempt Suicide) केला.
गेल्या दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक आवारामध्ये कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने एसटीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. आज सकाळी गगनबावडा आगारातील कर्मचारी सदानंद सखाराम कांबळे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्याला वाचवले. दरम्यान, कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर एसटी विभागात सरकारविरोधात पुन्हा एकदा संताप व्यक्त करण्यात येत आहे.