विद्यार्थ्यांना अवकाश क्षेत्रात अनेक करिअर संधी उपलब्ध : डॉ.राजीव व्हटकर

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश केंद्रास भेट दिली. यावेळी डॉ.व्हटकर यांनी येथे असणाऱ्या वेदर स्टेशन, एसआयडी, आयआरएनएसएस अशा उपकरणाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

    शिरोली : विद्यार्थ्यांना अवकाश व वातावरणशास्त्र क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. यामध्ये इसरो, आयआयजी, एनएआरएल, आयआयटीएम, आयएमडी या सारख्या नामवंत राष्ट्रीय संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, रिसर्च असोसिएट अशा अनेक पदासाठी करिअर संधी आहेत.असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे अवकाश वैज्ञानिक प्रा.डॉ.राजीव व्हटकर यांनी केले. संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकॉम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

    नुकतीच पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश केंद्रास भेट दिली. यावेळी डॉ.व्हटकर यांनी येथे असणाऱ्या वेदर स्टेशन, एसआयडी, आयआरएनएसएस अशा उपकरणाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

    डॉ.व्हटकर पुढे म्हणाले ” या अवकाश केंद्राच्या माध्यमातून वीज, वादळे, आर्द्रता इ विविध गोष्टींची निरीक्षणे नोंदविली जातात व याबद्दल ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यामध्ये जनजागृती केली जाते. हे अवकाश केंद्र शेतकऱ्यांचा मित्र म्हणून काम करते ”यावेळी प्रा.संदीप वाटेगावकर, प्रा. शिवराज पाटील, प्रा.दीपक कांबळे व तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकॉम्युनिकेशन चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.या उपक्रमासाठी विभागप्रमुख प्रा.आर.पी.धोंगडी, प्रा.रईसा मुल्ला प्रा.दीपा दिवटे, प्रा.बी.के.पाटील व यांचे सहकार्य लाभले.
    या उपक्रमाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी यांनी सर्वांचे कौतुक केले.