साखर कारखान्यावर ऊसाची काटामारी; अथणी शुगर येथील प्रकार

बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील अथणी शुगर्स साखर कारखाना बांबवडे येथे काटामारीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेतकरी वसंत कांदेकर (रा. कुंभोज ता. हातकणंगले) यांच्यासह जय शिवराय किसान संघटना यांनी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.

    शाहूवाडी : बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील अथणी शुगर्स साखर कारखाना बांबवडे येथे काटामारीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेतकरी वसंत कांदेकर (रा. कुंभोज ता. हातकणंगले) यांच्यासह जय शिवराय किसान संघटना यांनी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.

    याबाबत मिळालेली माहिती अशी, वसंत कांदेकर (कुंभोज ता. हातकणंगले) अथणी शुगर्स बांबवडे येथे आपला ऊस घातला होता. त्यांना आपल्या उसाचे वजन कमी आल्याचे आढळले. त्यांनी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांच्याकडे तक्रार केली असता शिवाजी माने यांनी वजन मापक पथकासह कारखान्याला भेट दिली. वजनकाट्याची पडताळणी केली असता ट्रकचे (एमएच ०४ केजे २५२०) वजन २३.४२० होते व नंतर केलेले वजन २४.४६० झाले. यात १.०४० टनाचा फरक आढळून आला.

    तक्रारदार कांदेकर यांनी अथणी शुगरला ट्रॅक्टर ट्रॉलीने ही ऊस घातला होता. यामध्येही फरक आला होता. आज बांबवडे येथे अथणी शुगर्स कारखान्याच्या वजन काट्याचा वजन मापन अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. या पथकामध्ये सांगली विभागाचे वजन मापन उपनियंत्रक डी. पी. पवार कोल्हापूर वजन मापक विभागाचे सहाय्यक नियंत्रक ए. टी. पाटील शाहुवाडीचे उपनियंत्रक एस.बी.सावंत आदी अधिकारी सहभागी झाले होते.