
कुरुंदवाड नगरपालिकेच्या आगामी निवडणुका (Kurundwad Municipality Election) माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवेची आवड व स्वच्छ चारित्र्य असलेल्या भ्रष्टाचारी विरहित समविचारी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन स्वबळावर लढवणार आहे.
कुरुंदवाड : कुरुंदवाड नगरपालिकेच्या आगामी निवडणुका (Kurundwad Municipality Election) माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवेची आवड व स्वच्छ चारित्र्य असलेल्या भ्रष्टाचारी विरहित समविचारी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अण्णासाहेब चौगुले व स्वाभिमानीचे तालुका उपाध्यक्ष बंडू उंमडाळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
आत्तापर्यंत सर्वांनीच स्वाभिमानी पक्षातील निवडून आलेल्या उमेदवाराचा उपयोगच करून घेतला आहे. मात्र, त्यांना योग्य ठिकाणी स्थान दिले गेले नाही, अशी खंत व्यक्त केली. जिल्हा बँक निवडणुकीतील महाआघाडी युतीचा प्रयोग आपण करणार काय ? असे विचारले असता परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल. फक्त आमच्याकडे येणारी व्यक्ती भ्रष्टाचारविरहित असावी, मग ती कोणत्याही पक्षाचे असो, नगरपालिका हा शब्द उच्चारता येत नाही किंवा व्यवस्थित लिहिता येत नाही, असे काही माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष कार्यरत आहेत.
शहराचा विकास करावयाचा असल्यास पदरमोड करून करावयाची गरज नाही. शासकीय विविध योजनांतून येणारा निधी व्यवस्थित आणून कसलाही स्वार्थ न ठेवता खर्च केल्यास शहराचा विकास होतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. आपण काहीतरी कमवण्यासाठी पालिकेत आलो आहे, ही प्रवृत्ती बंद झाली पाहिजे, असे चौगुले व उंमडाळे म्हणाले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी रोडे योगेश जिवाजे पिंटू औरवाडे अनिल आवटी अतुल मगदूम आदिनाथ भबीरे आदि उपस्थित होते.