The first Universal Sant Sahitya Sammelan in Kolhapur

कोल्हापूर येथे पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन १४, १५ व १६ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे (The first Universal Sant Sahitya Sammelan in Kolhapur).

    औरंगाबाद : कोल्हापूर येथे पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन १४, १५ व १६ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे (The first Universal Sant Sahitya Sammelan in Kolhapur).

    या वर्षी औरंगाबादेतील विवेकानंद महाविद्यालय या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी स्थापना वर्ष आहे. त्यामुळे विवेकानंद महाविद्यालय हे सहआयोजकाच्या भूमिकेत असल्याचे संस्थेचे सचिव श्रीमंतराव शिसोदे पाटील यांनी सांगितले संमेलनाचे अध्यक्ष मदन महाराज गोसावी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झाले होते.

    संत ज्ञानेश्वरांचा ७२५ वा समाधी सोहळा व संत नामदेवांची ७५१ वी जयंती यांचे औचित्य साधून अखिल विश्वातील सर्वधर्मसंप्रदायाचे अभ्यासक व उपासकांचे विचार या साहित्य संमेलनात ऐकण्यास मिळणार आहेत.