सोमय्या यांच्या अटकेसाठी शिरोळ प्रशासन तयार होते पण!

पहाटेपासूनच यावेळी पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने, प्रांताधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार डॉ.अपर्णा मोरे-धुमाळ, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्यासह मोठा फौजफाटा रेल्वे स्टेशन येथे तैनात करण्यात आला होता. परंतु कराड येथेच किरीट सोमय्या यांना थांबविण्यात आल्याने जयसिंगपूर पोलिसांची मोठी तारांबळ थांबली.

    जयसिंगपूर: गेले आठ दिवस सुरू असलेल्या मुश्रीफ- सोमय्या यांच्या वादाचा दुसरा अंक रविवारी रात्री पासून सुरु झाला. मुश्रीफ कुटुंबियांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. शंभर कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांनी सुरुवात केली असून काल रविवारी रात्री महालक्ष्मी एक्सप्रेस ते थेट कोल्हापूर गाठायचे ठरवले होते. परंतु कोल्हापूरला महालक्ष्मी एक्सप्रेस मधून निघाले असता कराड येथे त्यांना निषेधच्या आदेशान्वये थांबिवण्यात आले.
    राज्याचे ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व कुटुंबीयांनी बोगस कंपनी तयार करून शंभर कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानुसार संताजी घोरपडे कारखान्यामध्ये सोमय्या ते सोमवारी भेट घेणार होते. परंतु कराडमध्ये त्यांना थांबविण्यात आले. सोमय्यानी पोलिसांच्या विनंतीला मान नाही दिला तर कोल्हापूर चे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कलम १४४ लागू केलेनुसार त्यांना जयसिंगपूर येथे अटक करण्याच्या हालचाली शिरोळ प्रशासनाने पहाटे चार वाजल्यापासून सुरू केल्या होत्या.

    पहाटेपासूनच यावेळी पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने, प्रांताधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार डॉ.अपर्णा मोरे-धुमाळ, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्यासह मोठा फौजफाटा रेल्वे स्टेशन येथे तैनात करण्यात आला होता. परंतु कराड येथेच किरीट सोमय्या यांना थांबविण्यात आल्याने जयसिंगपूर पोलिसांची मोठी तारांबळ थांबली.

    रविवारी रात्रीपासूनच मोठा तणाव
    किरीट सोमय्यांचा दौरा जाहीर झाल्यापासूनच कोल्हापूर मध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. तर सोमय्यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाने योग्य फिल्डिंग लावली होती.