मशिनरी वाढवून अधिकची रोजगार निर्मिती करणार : डॉ. अशोकराव माने

    जयसिंगपूर : कोरोनाच्या परिस्थितीत ही सुतगिरणीने उत्तम काम केले आहे. ह्या सूतगिरणीने औद्योगिक प्रगती साधली असून मार्च पर्यंत पंचवीस हजार चात्याचा प्रकल्प पूर्ण करणार आहे. मशिनरी वाढवून जास्तीची रोजगार निर्मिती करणार असल्याची माहिती सूतगिरणीचे अध्यक्ष दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी दिली.

    देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यावेळी डॉ. अशोकराव माने म्हणाले, गेले दीड वर्षे कोरोनाच्या महामारीमध्ये देखील शासनाचे सर्व निकष पाळून सुतगिरण उत्तम पणे चालवली. त्याची दखल केंद्र व राज्य शासनाने सुद्धा घेतली आहे. सूतगिरणीचा उत्तम नमुना म्हणून ह्या सूतगिरणीची घोडदौड सुरू आहे. मशिनरी वाढवून रोजगार वाढविण्यासाठी नेहमीच पुढाकार राहील. पुढच्या वर्षीपासून सर्व सभासदांना लाभांश देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सर्व विषय मंजूर करण्यात आले. सभा खेळीमेळीत पार पडली.

    स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष अनिल कांबळे यांनी केले तर नोटीस वाचन प्रभारी कार्यलक्षी संचालक दिलीप काळे यांनी केले. यावेळी संचालक बाबासो मिसाळ, अमरसिंह धुमाळ, रेखादेवी माने,इंदुमती माने, सदाशिव पोपळकर, डॉ. अरविंद माने, नानासो राजमाने, सदाशिव बने,वसंत कांबळे, चिंतामणी निर्मळे, पीरगोंडा पाटील, मनोहर अडसुळे, संतोष पुजारी उपस्थित होते. आभार जितेंद्र चोकाककर यांनी मानले.