‘घोटाळेबाजांचा नाश करण्यासाठी कोल्हापुरला निघालोय’ – किरीट सोमय्या

किरीट सोमय्यांनी यापूर्वीही कोल्हापूर दौरा घोषित केला होता, त्यावेळी त्यांच्यावर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. पण आता सोमय्यांवरील ही जिल्हाबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापुरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    ‘आंबामातेचे दर्शन घेणारच हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असे राज्य सरकार व ग्रामविकास मंत्री हसन Hasan Mushrif मुश्रीफ यांना आव्हान देत भाजप नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya पुन्हा एकदा कोल्हापुरला रवाना झाले आहेत. आता कोल्हापुरला जाऊन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांची तक्रार करण्यासाठी कागल Kagal तालुक्यातील मुरुगूड पोलीस ठाण्यात Murgud Police station जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगीतले आहे.

    आत्तापर्यंत सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. यामध्ये पहिला आरोप म्हणजे कागलमधील सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याबाबतचा आहे. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला.  बाप बेटे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा पहिला आरोप सोमय्यांनी केला होता. मात्र, आता याचवेळी किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा तिसरा आरोप करण्याची शक्यता आहे.

    किरीट सोमय्यांनी यापूर्वीही कोल्हापूर दौरा घोषित केला होता, त्यावेळी त्यांच्यावर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. पण आता सोमय्यांवरील ही जिल्हाबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापुरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    दरम्यान, या सोमय्या यांच्या या दौऱ्यावेळी कोणिही त्यांना अडवूनका असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या समर्थकांना कोलं आहे.