सीएसआर फंडातून होणारा रस्ता गावठाणपासून सुरु करावा; धैर्यशील माने यांचे बांधकाम विभागाला पत्र

हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील गेल इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून होणारा रस्ता गावठाणपासून सुरु करावा, असे लेखी पत्र खासदार धैर्यशील माने व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शेतकर्‍यांच्या वतीने कार्यकारी अभियंता महेद्र क्षीरसागर यांना दिले. 

    शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील गेल इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून होणारा रस्ता गावठाणपासून सुरु करावा, असे लेखी पत्र खासदार धैर्यशील माने व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शेतकर्‍यांच्या वतीने कार्यकारी अभियंता महेद्र क्षीरसागर यांना दिले.
    मौजे वडगाव येथील गावठाण पासून मंजूर असणारा रस्ता व कामाची तशी वर्क ऑर्डर असूनही ठेकेदाराने चारशे ते पाचशे मीटर सोडून पुढचा रस्ता सुरू केल्याने गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्त्याचे काम बंद पाडले आहे. जोपर्यंत गावठाणपासून रस्ता सुरू करत नाही. तोपर्यंत काम करू न देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. सदर ठेकेदाराने रस्त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री घेऊन गेले असून रस्त्याचे काम अर्धवटच सोडले आहे. त्यामुळे वर्क ऑर्डर व ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार रस्त्याचे काम गावठाणपासून सुरु करावे यासाठी खासदार धैर्यशील माने व जि.प.च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी लेखी पत्रे बांधकाम विभागाला दिले आहेत.
    यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश कांबरे, बाळासो थोरवत, ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे, अमोल झांबरे उपस्थित होते.