नवीन नियमांसह पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन

पुणे : महापालिकेने शुक्रवारी कंटेन्मेंट झोन व अत्यावश्यक सेवांची दुकाने उघडण्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. सकाळी आठ ते दुपारी बारा आणि त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा यावेळेत कंटेन्मेंट झोन मध्ये दुकाने सुरू राहतील.

पुणे : महापालिकेने शुक्रवारी  कंटेन्मेंट झोन व अत्यावश्यक सेवांची दुकाने उघडण्याचे नवे वेळापत्रक  जाहीर केले आहे.  सकाळी आठ ते दुपारी बारा आणि त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा यावेळेत कंटेन्मेंट झोन मध्ये दुकाने  सुरू राहतील.

तसेच महापालिकेने शहरात मॉल्स आणि शॉपिंग मार्केट उघडण्यास परवानगी दिली आहे. दि.५ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत हे मॉल्स सुरू असतील. येथील सिनेमागृह आणि रेस्टॉरंट मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी याबाबतचे आदेश काढले आहेत. 

शहरात वाढत्या कोरोनाचे संक्रमण पाहता पुण्यातील लॉकडाऊन येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. नवीन नियमांसह हा लॉक डाऊन सुरू करण्यात येणार आहे. यात गोल्फ, नेमबाजी, जिम्नॅस्टिक, मल्लखांब तसेच आऊटडोअर बॅटमिंटन खेळण्यास मान्यता देण्यात आली आहे. भाजी मंडईतील दुकानेही दिवसाआड सुरू राहणार असून, ई-कॉमर्सच्या माध्यमातून अत्यावश्‍यक आणि बिगर अत्यावश्‍यक वस्तू घरपोच पोचविण्याची परवानगी आहे.

व्यापाऱ्यांसाठी तयार केलेला पी-१ पी-२ नियम बंद करण्याबाबत या आदेशात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच दुकानांसाठी या पूर्वीचेच नियम कायम असणार आहेत. तसेच टॅक्सी, कॅब मध्ये वाहन चालक अधिक ३ प्रवासी प्रवास करू शकतात.  रिक्षामध्ये वाहनचालक अधिक २ प्रवासी तर खाजगी चारचाकीमध्ये वाहनचालक अधिक ३ प्रवासी अशी मुभा राहील. दुचाकीवर डबल सीट जाण्यास मुभा देण्यात आली आहे.