मनोज जरांगे पाटील यांची ‘ही’ असणार पुढील दिशा; म्हणाले, आता आणखी एक महादिवाळी होणार…

मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरु केला असून ते आपली भूमिका मांडत आहे. जरांगे पाटील हे आज पुण्यामध्ये असून त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

    पुणे : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केले. अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु करुन जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा (Reservation) लढा सुरु केला. त्यानंतर मुंबईपर्यंत पायी दौरा करत लाखो मराठा बांधवांचा मोर्चा उभा केला. मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरु केला असून ते आपली भूमिका मांडत आहे. जरांगे पाटील हे आज पुण्यामध्ये असून त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

    पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या पुढच्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, “गेल्या 70-75 वर्षांतील मराठा समाजासाठीचा हा सर्वात मोठा कायदा झाला आहे. आता आणखी एक महादिवाळी होणार आहे. कायद्याच्या आधारे पहिले प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एक मोठी जंगी सभा होणार असल्याची” घोषणा देखील मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातून केली.

    पुढे जरांगे पाटील म्हणाले, “मी प्रामाणिक आंदोलन आणि नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. मी पाचवी शिकलो आहे की 12 वी शिकलो आहे हे शोधण्यासाठी सरकारने तीन चार दिवस घालवले. आरक्षणावर तत्काळ उपाय शाधण्याचा प्रयत्न केला आहे. आरक्षणावर तात्काळ उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे,” असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. “लाठीहल्ला झाला त्याला आम्ही टर्निंग पॉइंट म्हणू शकत नाही. आमच्या आया-बहिणींना मारहाण झाली. आम्हाला धिंगाणा करायचा असता तर, पहिल्याच दिवशी केला असता. लाठीहल्ला होण्यासाठी तीन दिवस वाट का पाहिली असती? एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी माझे कौतुक केले” असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.