पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिस दलात मोठी खळबळ

पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस निरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. शिल्पा चव्हाण (Shilpa Chavan Suicide) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

    पुणे : पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस निरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
    शिल्पा चव्हाण (Shilpa Chavan Suicide) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा चव्हाण या शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षा विभाग तसेच एमओबी या दोन ब्रँचचा पदभार त्यांच्याकडे होता. दरम्यान, त्यांचा स्टाफ त्यांना घरी आणण्यासाठी गेला होता. बराचवेळ फोन लावल्यानंतर देखील त्या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यावेळी त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. दरम्यान, त्यांना एक मुलगा असून, तो गावी गेला होता. त्या घरी एकट्याच असल्याचे सांगण्यात आले आहे.

    धाडसी कारवायांमुळे सतत चर्चेत

    अत्यंत शांत आणि प्रेमळ पोलीस निरीक्षक म्हणून त्या सर्वांना परिचित होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये देखील त्या ओळखल्या जात होत्या. धाडसी कारवायामुळे त्या सतत चर्चेत असत. परंतु, अचानक झालेल्या या घटनेने पुणे शहर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.