पुणे शहर भाजपचे दूध एल्गार आंदोलन

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दूध उत्पादक शेतकर्यांना प्रति लिटर १० रुपये याप्रमाणे थेट अनुदान त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावे, दुध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, गायीच्या दूधाला प्रति लिटर ३० रुपये दर द्यावा अशा प्रमुख मागण्या आहेत.

मुख्यमंत्री महोदय खवा खा पण दूधाला भाव द्या

पुणे  : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दूध उत्पादक शेतकर्यांना प्रति लिटर १० रुपये याप्रमाणे थेट अनुदान त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावे, दुध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, गायीच्या दूधाला प्रति लिटर ३० रुपये दर द्यावा अशा प्रमुख मागण्या आहेत. ३१ जुलैपर्यंत राज्य शासनाने या मागण्या मान्य कराव्यात यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीने आज ठिकठिकाणी दूध एल्गार आंदोलन करण्यात आले.

मांजरी, नसरापूर, बावधान, कामशेत, उरळी मंतरवाडी फाटा, कात्रज, डोणजे आणि वाघोलीत आंदोलन करण्यात आले. कोथरूड मतदारसंघाच्या वतीने बावधन येथे आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामशेत येथे आंदोलन करण्यात आले. वडगावशेरी मतदारसंघाच्या वतीने शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली मांजरी येथे दूधापासून खवा बनविण्याचे अभिनव आंदोलन करण्यात आले. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली वाघोली येथे आंदोलन करण्यात आले. आमदार भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली डोणजे येथे आंदोलन झाले.

यावेळी पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, रोहिदास सेठ उंद्रे,स्वप्नील उंद्रे,संतोष खांदवे, संदीप जऱ्हाड, मनीषा उंद्रे,संतोष राजगुरू, बेबीताई उंद्रे,अर्जुन जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, विकास उंद्रे,आशा जगताप, रावसाहेब राखपसरे, सुधीर गलांडे,अरविंद गोरे, शांताराम उंद्रे,धनंजय जाधव, भानुदास भोसले,सुशीला पवार, राजू साखरे, संदीप मोझे,दत्ताभाऊ मस्के, राजेंद्र पठारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.