whatsapp wont work on old iphones android smart phones in new year 2021

सोशल मिडीयाच्या माध्यमातून या भागातील व्हॉट्सॲप ग्रुपवर समाज विघातक, आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर, व्हिडीओ पोस्ट टाकून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरातील तब्बल ५३० व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला नोटिसा देण्यात आल्या असून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ग्रुपवरही पोलिसांचे लक्ष असून संबंधित ॲडमिनवरही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

 

शिक्रापूर:कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांकडून प्रत्येक बाबींवर बारकाईने लक्ष दिले जात असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून या भागातील व्हॉट्सॲप ग्रुपवर समाज विघातक, आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर, व्हिडीओ पोस्ट टाकून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरातील तब्बल ५३० व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला नोटिसा देण्यात आल्या असून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ग्रुपवरही पोलिसांचे लक्ष असून संबंधित ॲडमिनवरही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १२० व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला तर तर लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ४१० व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला पोलिसांकडून लेखी नोटिस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रुप ॲडमिनने आपल्या ग्रुपवर लक्ष ठेवण्यासह योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना संबंधित ॲडमिनला देण्यात आल्या असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर व लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली आहे, तर व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास ग्रुप ॲडमिनलाच जबाबदार धरून अटकेची कारवाई करण्यात येणार असून या गुन्ह्यासाठी तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सर्व व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन यांनी सावध राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. शक्यतो ग्रुप ॲडमिन यांनी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपची सेटींग बदलून पोस्टचे नियंत्रण करावे असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.