एक लाख १६ हजार मुलांना मिळणार कोरोना लसीचे कवच

पात्र लाभार्थ्यांनी १ जानेवारी २२ पासून कोविन पोर्टलवर नावनोंदणी करावी असे आवाहन, महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे. केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार १५ ते १८ या वयोगटासाठी महापालिका लसीकरण मोहिम हाती घेत आहे.

    •  १५ ते १८ वयोगटातील मुलांचे सोमवारपासून लसीकरण

    पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहरातील १५ ते १८ या वयोगटांतील मुले आणि मुलींना येत्या सोमवार (दि.३) पासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. या वयोगटातील १ लाख १६ हजार ७०० मुले – मुली शहरात आहेत. या पात्र लाभार्थ्यांनी १ जानेवारी २२ पासून कोविन पोर्टलवर नावनोंदणी करावी असे आवाहन, महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

    केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार १५ ते १८ या वयोगटासाठी महापालिका लसीकरण मोहिम हाती घेत आहे. जन्माचे वर्ष २००७ व त्या पूर्वीचे असलेले सर्व मुले आणि मुली डोस घेऊ शकतात. त्यासाठी शनिवार (दि. १) पासून कोविड पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.लाभार्थी स्वत: नोंदणी करू शकतात किंवा नोंदणीसाठी कोविड पोर्टलवर असलेल्या खात्याद्वारे ऑनलाइन पद्धतीने किंवा युनिक मोबाईल क्रमांकाद्वारे नवीन खाते तयार करून देखील नोंदणी करू शकतात. ही सुविधा सध्या सर्व पात्र लाभाथ्र्यांसाठी उपलब्ध आहे. ३ जानेवारी पासून लसीकरण केंद्रांवर जाऊन ऑनसाईट पध्दतीने लसीकरण कर्मचाऱ्यांकडेही नोंदणी करू शकतात. लसीकरणासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने तयारी सुरू केली असल्याचे डॉ. गोफणे यांनी सांगितले.