लसीकरण केंद्रांवरील गर्दी नियंत्रणासाठी महिन्याकाठी साडे १० लाखाचा खर्च

महापालिका सुरक्षा विभागामार्फ़त महापालिका मालमत्तांच्या सुरक्षेसाठी ठेकेदारी पद्धतीने काम देण्यात आले आहे. नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्यामार्फत रखवालदार आणि मदतनीस पुरविण्यात येत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दींमध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी कर्मचारी, नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे तेथे नियुक्त असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

    पिंपरी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फ़त आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दींमध्ये कोरोना लसीकरण केंद्रे सुरू आहेत. या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाच रखवालदारांचे मदतनीस नियुक्त करण्यात येणार आहेत. ४४ मदतनीसांसाठी प्रति महिना प्रति कर्मचारी २४ हजार ५१ रूपये याप्रमाणे १० लाख ५८ हजार रूपये एवढा खर्च होणार आहे.

    महापालिका सुरक्षा विभागामार्फ़त महापालिका मालमत्तांच्या सुरक्षेसाठी ठेकेदारी पद्धतीने काम देण्यात आले आहे. नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्यामार्फत रखवालदार आणि मदतनीस पुरविण्यात येत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दींमध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी कर्मचारी, नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे तेथे नियुक्त असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

    आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दींमध्ये कोरोना लसीकरण केंद्रांवरील गर्दी आटोक्यात ठेवून वैद्यकीय सेवा देण्यात अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाच रखवालदारांचे मदतनीस नियुक्त करण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी सूचना केल्या आहेत. याशिवाय महापालिकेमार्फ़त पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या सोडतीमधील लाभार्थींच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग येथे लाभार्थींना बोलविण्यात येणार आहे. या कामकाजासाठी येणाऱ्या लाभार्थींची संख्या जास्त असल्याने या ठिकाणी चार सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

    सुरक्षा विभागाकडे सध्या नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस या संस्थेमार्फत रखवालदार मदतनीस पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या दोन्ही कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरूपात ठेकेदारी पद्धतीने ११ मार्च २०२१ ते ११ एप्रिल २०२१ या कालावधीकरिता एकूण ४४ रखवालदारांच्या मदतनीसांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यानुसार, या ४४ मदतनीसांसाठी प्रति महिना प्रति कर्मचारी २४ हजार ५१ रूपये याप्रमाणे १० लाख ५८ हजार रूपये एवढा खर्च होणार आहे.