शिवणेत १५ वाहने आगीत जळून खाक; पार्किंगमधील १३ दुचाकी आणि २ रिक्षांचा समावेश

शिवणे येथील शिंदे पुलाजवळ शिवकमल प्रेस्टीज ही ५ मजली इमारत आहे. तिच्या पार्किंगमधील वाहनांना पहाटे ५ वाजता आग लागल्याची खबर अग्निशमन दलाला मिळाली. पाठोपाठ अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत सर्व वाहने पेटली होती.

    पुणे : शिवणे येथील शिवकमल प्रेस्टीज या इमारतीच्या पार्किंगमधील १३ दुचाकी आणि २ रिक्षा आगीत जळून खाक झाली. कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावून वाहने जाळल्याचा नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे.

    शिवणे येथील शिंदे पुलाजवळ शिवकमल प्रेस्टीज ही ५ मजली इमारत आहे. तिच्या पार्किंगमधील वाहनांना पहाटे ५ वाजता आग लागल्याची खबर अग्निशमन दलाला मिळाली. पाठोपाठ अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत सर्व वाहने पेटली होती. जवानांनी तातडीने ही आग विझविली.