विवाह करण्यासाठी सतत हट्ट करत मानसिक व शारिरीक छळ केल्याच्या नैराश्यातून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

अर्पणा हिचा काही वर्षांपुर्वी विवाह झाला होता. परंतु, कौटुंबिक वाद तसेच क्रुर वागणूक व शारिरीक व मानसिक छळ होत असल्याने तिने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिची दुसऱ्या आरोपीशी ओळख झाली होती. त्यांची चांगली मैत्री झाल्यानंतर ते दोघे लग्न करणार होते. परंतु, घटस्फोट घेतलेला आरोपी पती देखील तिला पुन्हा लग्न करण्यासाठी हट्ट धरत संसार करणार होता.

    पुणे : पहिल्या पतीने आणि मित्राने विवाह करण्यासाठी सतत हट्ट धरून मानसिक व शारिरीक छळ केल्याच्या नैराश्यातून २२ वर्षीय तरूणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली आहे. तिच्या आत्महत्येस जबाबदार धरत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्पणा अनिल अंभगे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती व मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अर्पणा हिची आईने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १८ सप्टेंबर रोजी या तरूणीने गळफास घेतला होता.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पणा हिचा काही वर्षांपुर्वी विवाह झाला होता. परंतु, कौटुंबिक वाद तसेच क्रुर वागणूक व शारिरीक व मानसिक छळ होत असल्याने तिने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिची दुसऱ्या आरोपीशी ओळख झाली होती. त्यांची चांगली मैत्री झाल्यानंतर ते दोघे लग्न करणार होते. परंतु, घटस्फोट घेतलेला आरोपी पती देखील तिला पुन्हा लग्न करण्यासाठी हट्ट धरत संसार करणार होता. दोघेही अर्पणा हिला लग्न करण्यासाठी हटट् धरत होते. तसेच, त्यातून ती नैराश्यात होती. ती मानसिक तणावात होती. या तणावातून तिने गळफास लावून आत्महत्या केली. अधिक तपास महिला उपनिरीक्षक ठाकूर या करत आहेत.