पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; रुग्णसंख्या पोहोचली…

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराच्या विविध भागातील 2 हजार 277 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. त्यात 2 रुग्ण ओमायक्रॉनचे आढळले आहेत.

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराच्या विविध भागातील 2 हजार 277 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. त्यात 2 रुग्ण ओमायक्रॉनचे आढळले आहेत. तर, कोरोनामुक्त झालेल्या 816 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला.

    आत्तापर्यंत शहरातील 4 हजार 528 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 92 हजार 261 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 10 हजार 947 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 10 हजार 607 रुग्ण गृहविलगीकरणात असून 340 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 101 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 496 आहेत.

    दरम्यान, आज दिवसभरात 1 हजार 231 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 31 लाख 30 हजार 137 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.