बारामती सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी २३५ अर्ज दाखल

सर्वसाधारण प्रभागासाठी १५८अर्ज दाखल झाले आहेत. महिला राखीव प्रवर्गासाठी १६, इतर मागासवर्ग प्रवर्ग- २५, अनुसूचित जाती जमाती- १७ तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठी २६ अर्ज दाखल झाले आहेत.

    बारामती :  येथील बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी (दि. २२) १५ जागांसाठी २३५ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी दिली.

    सर्वसाधारण प्रभागासाठी १५८अर्ज दाखल झाले आहेत. महिला राखीव प्रवर्गासाठी १६, इतर मागासवर्ग प्रवर्ग- २५, अनुसूचित जाती जमाती- १७ तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठी २६ अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी (दिन
    . २३) उमेदवारी अर्जांची छाननी झाली आहे . आज बुधवारी (दि. २४) वैध अर्ज असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. ८ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार असून आवश्यकता भासल्यास १९ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.