दुचाकी चोरांकडून साडे दहा लाखाची २५ दुचाकी जप्त ; भोसरी पोलिसांची मोठी कामगिरी

पिंपरी :  सराईत चोरटा आणि त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांकडून भोसरी पोलिसांनी १० लाख ५५ हजार रुपये किमतीच्या २५ दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड, पुणे, पुणे ग्रामीण, अहमदनगर, नाशिक ग्रामीण परिसरातील २२ गुन्हे उघडकीस आले आहेत. अन्य तीन दुचाकींबाबत पोलिसांचा शोध सुरू आहे.

पिंपरी :  सराईत चोरटा आणि त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांकडून भोसरी पोलिसांनी १० लाख ५५ हजार रुपये किमतीच्या २५ दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड, पुणे, पुणे ग्रामीण, अहमदनगर, नाशिक ग्रामीण परिसरातील २२ गुन्हे उघडकीस आले आहेत. अन्य तीन दुचाकींबाबत पोलिसांचा शोध सुरू आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुरू असलेल्या वाहन चोरीच्या घटनांबाबत सर्व पोलीस स्टेशन आणि इतर सर्व पथकांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भोसरीचे वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांनी उपनिरीक्षक सिद्धेश्वर कैलासे आणि महेंद्र गाढवे यांची दोन पथके तयार केली. उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांच्या पथकातील पोलीस शिपाई चेतन साळवे यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी अजित अमृता साबळे (वय २५, रा. मरवेशी, पो. राजुर ता. अकोले, जि. अहमदनगर) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्या दोघांकडून पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर ग्रामीण व नाशिक ग्रामीणमधून चोरलेल्या एकुण १८ महागडया दुचाकी गाडया जप्त केल्या आहेत. या पैकी ११ गाड्या अकोले या परिसरात ठेवल्या होत्या. पोलिसांनी अकोले येथून त्या दुचाकी हस्तगत केल्या. या कारवाईमुळे १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलासे यांच्या पथकाने दोन अल्पवयीन वाहन चोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या असून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

दोन्ही कारवायांमध्ये भोसरी ४, सांगवी २, चाकण २, चिखली १, विश्रांतवाडी १, खडक २, नारायणगाव १, आळेफाटा १, अकोले (अहमदनगर) २, संगमनेर (अहमदनगर) शहर १, राजुर (अहमदनगर) शहर १, घोटी ( नाशिक ग्रामिण) १, कोथरूड हदीतुन चोरलेली १, राजुर १ असे २२ गुन्हे उघडकीस आले असून ३ दुचाकींबाबत पोलिसांचा शोध सुरू आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप पोलीस आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, नामदेव तळवडे, कर्मचारी चंद्रकांत तिटकारे, अजय डगळे, गणेश हिंगे, पोलीस शिपाई बाळासाहेब विधाते, सागर जाधव, सागर भोसले, चेतन साळवे, अशोक ताथवडे, संतोष महाडीक, समीर रासकर, आशिष गोपी, सुमीत देवकर, गणेश सावत यांच्या पथकाने केली आहे.