खेडमध्ये २४ तासांत ३० पॉझिटिव्ह

बाधितांच्या प्रमाणात लक्षणीय घट
राजगुरूनगर  : खेड तालुक्‍यात २४ तासांत तालुक्‍यात नव्याने ३० जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. तालुक्‍यात बाधितांचा आकडा १८९० तर मृताची संख्या ४८ वर पोहोचली आहे. तर १५६६ जण उपचारानंतर बरे झाले असून २७७ जणांवर उपचार सुरू आहेत. चाकण नगरपरिषद हद्दीत बाधितांची संख्या घटत असल्याने ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. खेड तालुक्‍यात मागील २४ तासांत चाकण (१०),आळंदी (४), राजगुरूनगर (०) अशा तीन नगरपरिषदां मिळून १४ तर ग्रामीण भागातील धानोरे गावात (६), वडगाव घेनंद, मरकळ, राक्षेवाडी, कडाचीवाडी, पिंपरी बुद्रुक, मेदनकरवाडी, खराबवाडी, शेलपिंपळगाव, चिंचोशी प्रत्येकी एक असे १३ अशा एकूण ३० जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.