लग्न करण्याचे अमिष दाखवून ३२ वर्षीय महिलेला १६ लाख रुपयांचा गंडा

तक्रारदार यांनी एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर नाव नोंदविले होते. त्यानंतर या आरोपीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना विवाह करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्याशी बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना लग्न करण्याचे अमिष दाखविले. त्याने आपण व्यावसायिक असल्याचे सांगितले होते.

    पुणे : विवाह नोंदणी साईटवरून ओळख झाल्यानंतर एका महिलेला लग्न करण्याचे अमिष दाखवत विश्वास संपादन करून नवीन प्रोजेक्टसाठी म्हणून १६ लाख रुपये घेत गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर नाव नोंदविले होते. त्यानंतर या आरोपीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना विवाह करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्याशी बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना लग्न करण्याचे अमिष दाखविले. त्याने आपण व्यावसायिक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने एका प्रकल्पासाठी पैसे हवे असल्याचा बहाणाकरत त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख २६ हजार रुपये घेतले. परंतु, त्यांच्याशी लग्न केले नाही. तसेच, त्यांना विविध कारणे सांगून पैसे मागत असे. त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.