शहरात  ४ हजार ८५७ नवे कोरोनाबाधित;  १ हजार ८०५ रुग्णांची कोरोनावर मात

शहरातील आरोग्य सेवेतील महत्वाचे असलेल्या ससुन रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी असे शंभर जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.यापैकी बहुतेकांना सौम्य लक्षणे असुन, काही जणांना विलगीकरणाचा कालावधी पुर्ण होत आला आहे अशी माहीती महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर असोसिएनच्या सुत्रांनी दिली.

    पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ४ हजार ८५७ ने भर पडली आहे. ससुन रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर शहरातील एकासह दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    कोरोना संसर्गाचा वेग जोरात असुन, संशयित २० हजार ८०१ जणांच्या चाचण्या केल्या गेल्या. यामध्ये ४ हजार ८५७ जण कोरोना बाधित आढळून आले आहे. तर १ हजार ८०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सक्रीय रुग्णांची संख्या २२ हजार ५०३ पर्यंत पोचली आहे.

    शहरातील आरोग्य सेवेतील महत्वाचे असलेल्या ससुन रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी असे शंभर जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.यापैकी बहुतेकांना सौम्य लक्षणे असुन, काही जणांना विलगीकरणाचा कालावधी पुर्ण होत आला आहे अशी माहीती महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर असोसिएनच्या सुत्रांनी दिली. दहा डॉक्टर आणि इतर सर्व कर्मचारी आहे, यामुळे सध्या ससुन रुग्णालयात मनुष्यबळ कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. दरम्यान, शहरातील कोरोनाबाधित रुग्णवाढीचा वेग टिकून राहीला आहे.