maharashtra police

आषाढी कार्तिकी वारीनंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन सोहळा असतो. या सोहळ्यातही मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्र आळंदी येथे ६ ते १६ डिसेंबर या कालावधीत संचारबंदी असणार आहे.

पुणे : राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार कडक उपाययोजना करत आहे. कोरोना काळातील नियमाचे उल्लंघन, तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत. आहे. पुण्यात कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळेच पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ नये. यासाठी पुण्यातील आळंदीमध्ये (curfew imposed on Alandi ) उद्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

आषाढी कार्तिकी वारीनंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन सोहळा असतो. या सोहळ्यातही मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्र आळंदी येथे ६ ते १६ डिसेंबर या कालावधीत संचारबंदी असणार आहे. यंदा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोळ्यानिमित्त कार्तिकी यात्रा येत्या८ ते १४ डिसेंबरपर्यंत होणार आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी लागू केल्याचे पिपरी पोलिस उपायुक्त मच्चांक इप्पर यांनी सांगितलं आहे.

आळंदीत पंढरपूरवरुन येणाऱ्या श्री. पांडुरंग, संत नामदेव, संत पुंडलिक या तीन दिंड्यांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परंतु प्रशासनाने एखा पालखीसोबत २० वारकऱ्यांना परवनगी दिली असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.