marriage fraud

पहिल्या बायकोचे निधन झाल्याचे खोटे सांगून दुसरे लग्न केले. त्यानंतर दुसऱ्या बायकोच्या परस्पर तिसरे आणि चौथेही लग्न केले. यातील एका पत्नीने चार-चार लग्न करणाऱ्या या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

पुणे : एक दोन नव्हे तर तब्बल चार लग्न करणाऱ्या ६० वर्षीय नवरदेवा विरोधात पुणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.  यातील एका पत्नीने या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पहिल्या बायकोचे निधन झाल्याचे खोटे सांगून दुसरे लग्न केले. त्यानंतर दुसऱ्या बायकोच्या परस्पर तिसरे आणि चौथेही लग्न केले. यातील एका पत्नीने चार-चार लग्न करणाऱ्या या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारदार महिला ही या व्यक्तीची दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीचे निधन झाल्याचे सांगून त्याने तिच्याशी विवाह केला. यांनतर या व्यक्तीने आणखी दोघींशी लग्न केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.

लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतर फिर्यादी महिलेचा क्रूरतेने लैंगिक छळ केला. याला विरोध केला असता पतीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या महिलेने पोलिसांना सांगीतले. भोसरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.