जळोची स्मशानभूमीत आढळला अर्धवट जळालेला युवकाचा मृतदेह; बारामतीत खळबळ

बारामती शहराच्या हद्दीत असलेल्या जळोची स्मशानभूमीच्या मागे ३५ वर्षीय युवकाचा अर्धवट अवस्थेत जळाळेला मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अभिजित विजय खरात (रा. अंथुर्णे, ता. इंदापूर जि. पुणे, सध्या, रा.श्रीरामनगर, ता. बारामती) असे मयत युवकाचे नाव असून शनिवारी (दि.१२) सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला आहे. 

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती शहराच्या हद्दीत असलेल्या जळोची स्मशानभूमीच्या मागे ३५ वर्षीय युवकाचा अर्धवट अवस्थेत जळाळेला मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अभिजित विजय खरात (रा. अंथुर्णे, ता. इंदापूर जि. पुणे, सध्या, रा.श्रीरामनगर, ता. बारामती) असे मयत युवकाचे नाव असून शनिवारी (दि.१२) सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला आहे.

    खरात या युवकाने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. माञ हा घातपात असण्याची दाट शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.

    अभिजित खरात हा युवक एका औषध विक्रीच्या दुकानात कामाला होता. पोलीसांनी केलेल्या प्राथमिक तपासात त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करत शवविच्छेदनानंतर अधिक गोष्टी स्पष्ट होतील असे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक करत आहेत.

    एफबी हॅक झालय माझं…

    अभिजित खरात याने एक दिवसापूर्वी एफ. बी हॅक झालंय माझं…अशी पोस्ट त्याच्या फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यामूळे नक्कीच अभजित याची हत्या की आत्महत्या ? हे सखोल तपासानंतर निष्पन्न होणार आहे.