मानलेल्या भावाने महिलेवर केला बलात्कार

खोलीची कडी आतून लावून महिलेला 'तुझे व माझे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेल आणि तुझा नवरा काही बोललाच तर त्याला तेथेच मारून टाकीन. मी सांगेल तसे कर', असे म्हणून धमकी देत त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

    पिंपरी : मानलेल्या भावाने विवाहितेला मोबाईलमधील फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी देत बलात्कार (Rape in Chikhali) केला. ही घटना चिखली येथे घडली. रामहरी वगरे (वय ३१, रा. असंगी, ता. जत, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    आरोपी रामहरी हा पीडित महिलेच्या ओळखीचा असून, महिलेने त्याला भाऊ मानले होते. तसेच त्यांच्या घराच्या गच्चीवरील खोली त्याला भाड्याने दिली होती. महिला कामानिमित्त नेहमी गच्चीवर जात असे. यावेळी आरोपी रामहरीने त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्यासोबत मोबाईलमध्ये फोटोही काढले होते. २१ डिसेंबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास महिला पाण्याच्या टाकीचा कॉक सुरु करण्यासाठी गच्चीवर गेल्या होत्या. त्यावेळी त्या एकट्याच असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने त्यांना गच्चीवरील खोलीत ओढत नेले.

    खोलीची कडी आतून लावून महिलेला ‘तुझे व माझे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेल आणि तुझा नवरा काही बोललाच तर त्याला तेथेच मारून टाकीन. मी सांगेल तसे कर’, असे म्हणून धमकी देत त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केला.