घरफोडीचा विस्फोट; साडे चार तास घर बंद, चोरट्यांनी 73 लाखांचा ऐवज चोरला

श्रीधर हे काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे बंधू आहेत. श्रीधर हे व्यवसायिक असून, कलमाडी साई सर्व्हीस स्पेअर्स या कंपनीचे संचालक आहेत.रविवारी (१३ मार्च) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कलमाडी आणि त्यांची पत्नी नातेवाईकांकडे जेवण करण्यासाठी गेले होते.

    पुणे : शहरात घरफोडीचा विस्फोट झाला असून, केवळ साडे चार तासासाठी घराला कुलूप लावून गेल्यानंतर चोरट्यांनी फ्लॅट फोडून तबल 73 लाखांचा ऐवज चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाणेरमध्ये ही घटना घडली आहे.
    याप्रकरणी श्रीधर शामराव कलमाडी (वय ७४, रा. बाणेर रस्ता) यांनी या चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधर हे काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे बंधू आहेत. श्रीधर हे व्यवसायिक असून, कलमाडी साई सर्व्हीस स्पेअर्स या कंपनीचे संचालक आहेत.रविवारी (१३ मार्च) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कलमाडी आणि त्यांची पत्नी नातेवाईकांकडे जेवण करण्यासाठी गेले होते. ते जेवणकरून रात्री साडेदहाच्या सुमारास घरी आले. त्यावेळी त्यांना खिडकीची जाळी उचकटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पाहणी केली असता कपाटाचे दरवाजे उघडून हिरेजडीत सोन्याचे दागिने, रोकड असा ७२ लाख ९३ हजारांचा ऐवज लांबविण्यात आल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी पोलीसांना घटनेची माहिती दिली. चतुःशृंगी पोलिसांनी धाव घेतली. सीसीटीव्ही व इतर माहितीवरून चोरट्यांचा माग काढला जात आहे. दरम्यान कलमाडी यांच्या घरात चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहा्ययक आयुक्त किशोर जाधव, पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड आदींनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळगावे तपास करत आहेत.