उसने घेतलेले पैसे परत न केल्याने टोळक्याकडून घरात घुसून तोडफोड; पुण्यातील प्रकार

हात उसने घेतलेले पैसे परत न केल्यावरून टोळक्याने दारावर कोयते, हातोडा व तलवारीने मारून जबरी चोरी (Pune Crime) करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना साईनाथनगर (Crime in Sainathnagar) भागात घडली.

    पुणे : हात उसने घेतलेले पैसे परत न केल्यावरून टोळक्याने दारावर कोयते, हातोडा व तलवारीने मारून जबरी चोरी (Pune Crime) करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना साईनाथनगर (Crime in Sainathnagar) भागात घडली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) बलजिंदर भट्टी (वय ५६) यांनी तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी रिंकु कलवंतसिंग चौहान (वय ३४, रा. पिंपरी) व बिट्टु सुखदेवसिंग माही (वय २७) यांना अटक केली आहे. तर, इतर तीनजन फरार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. तक्रारदार यांच्या वडिलांनी रिंकू चौहान याच्याकडून हात उसने पैसे घेतले होते. ते पैसे त्यांनी परत केले नव्हते. त्या रागातून आरोपी त्यांच्या घरी आले. त्यांनी दारावर हातोडा, कोयता व तलवारीने मारून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाव घेतली. तसेच, दोघांना अटक केली. पण, त्यांचे इतर तीन साथीदार पसार झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.